म्हसावद । प्रतिनिधी
मणिपूरमध्ये घटनेच्या दोषींवर कारवाईची मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमध्ये जमावाने दोन आदिवासी महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या संतापजनक घटनेचा निषेध करत आहे.
मणिपूरची घटना हा माणुसकीवर लागलेला कलंक आहे. मन हेलावून टाकणारी घटना भारत देशात घडली असून सकल जगातील मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.
मणिपूर राज्यातील थौबाल जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना काही नराधमांनी घेरले. त्यांनी त्या महिलांना विवस्त्र करुन त्यांची भररस्त्यात नग्न धिंड काढली. त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सदर घटना ही ४ मे २०२३ रोजीची झाली आहे
मणिपूर राज्यात सातत्याने आदिवासी समाजावर अनन्वित अन्याय, अत्याचार, जाळपोळ, जातीय हिंसा, सामूहिक बलात्कार होत आहे. तरी सुद्धा केंद्र सरकारने/ मणिपूर राज्य सरकार आजपर्यंत याबाबत कोणतीही कठोर भूमिका घेतलेली नाही, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे होत आहे. तरीही या देशातील विचित्र, विक्षिप्त, विकृत मानसिकता बदलली नाही.
मणिपूर मध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे व मणिपूर मधील आदिवासी महिलावर बलात्कार केला आहे त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड l.गणपत पाडवी, तळोदा नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे, तळोदा ता.अध्यक्ष सुरेश वळवी, तळोदा शहराध्यक्ष विनोद पाडवी, शहरउपाध्यक्ष अरविंद प्रधान, शहरसचिव अजय पाडवी, तालुका सचिव फत्तेसिंग पाडवी, अविनाश पाडवी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








