नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील हिरा प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उदात्त ध्येयाने आपले शैक्षणिक कार्य करत असून गेल्या काही वर्षापासून एक उपक्रमशील शैक्षणिक संस्था म्हणून संस्थेने नावलौकिक मिळवला आहे. कारण संस्थेच्या अंतर्गत विद्यालयाच्या वतीने शिक्षण,क्रीडा,आरोग्य व पर्यावरण संदर्भात नेहमीच नवनवीन संकल्पना व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा बौद्धिक,शारीरिक व मानसिक विकास करण्यासाठी प्रयत्न केला जातो.
संस्थेने यात आणखी भर म्हणून मोठमोठ्या शहरात विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे हॉर्स रायडिंग (घोडेस्वारी) चे प्रशिक्षण ची सुविधा संस्था अंतर्गत प्राथमिक ,माध्यमिक ,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
शहरात हाॅर्स रायडींग प्रशिक्षणाची मुहूर्त रोवून,विद्यार्थी व तरुणांना अश्व चालविण्याचे ज्ञान व्हावे ही हिरा उद्योग समुहाचे उद्योजक तथा युवा नेतृत्व मा.प्रणव रविंद्र चौधरी यांची प्रेरणा व संकल्पना असून हिरा फिटनेस क्लब जवळ हिरा हॉर्स रायडींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व तरुणांना या प्रशिक्षणातून प्रशिक्षक उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यात अश्व ओळख, अश्व चालवणे, अश्र्वाची गती नियंत्रण करणे,अश्वावर बसण्यास व संतुलन ठेवण्यास मार्गदर्शन करणे इ. अनेक महत्त्वाची माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक, व निर्णय क्षमतांचा विकास होण्यास मदत होते.
सदर नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी हिरा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तथा हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी,हिरा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव मा.आमदार.श्री.शिरीष चौधरी, हिरा उद्योग समूहाचे उद्योजक व युवा नेतृत्व प्रथमेश शिरीष चौधरी, यश शिरीष चौधरी यांचे मार्गदर्शन व अनमोल सहकार्य असून वेळोवेळी प्रशिक्षण केंद्राला त्यांची उपस्थिती लाभत असते.
सदर प्रशिक्षण केंद्रात मिळणारे प्रशिक्षण हे हिरा प्रतिष्ठान अंतर्गत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात प्राथमिक विद्यालातील विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत.








