नंदुरबार l प्रतिनिधी
स्वराज्याचे जनक आणि गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 167 व्या जयंती निमित्त येथील शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
बालवीर चौकात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस डि.आर.हायस्कूलचा विद्यार्थी कार्तिक सुभाष राजपूत याच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याला उजाळा देऊन उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.
अभिवादन प्रसंगी पत्रकार सुभाष राजपूत, भरत मोरे, विशाल हिरणवाळे तसेच धीरेन सुदाम हिरणवाळे,तेजस्विनी महेंद्र वाघ, तन्मयी ज्ञानेश्वर चौधरी, दिशा विनोद भैय्या, यश विनोद भैय्या, प्रिन्स राहुल कुशवाह, तन्मय ज्ञानेश्वर चौधरी, प्रीतम राहुल कुशवाह, आदी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.








