नंदुरबार l प्रतिनिधी
बदलती जिवनशैली, ताणतणाव, तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असून’ सध्या बहुतांश नागरिकांमध्ये असांसर्गिक आजाराचे प्रमाण वाढले आहेत.त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभाग विशेष योजना अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना मधून मुख व स्तन कर्करोग रुग्णांचे प्रारंभीक निदान करण्याकरिता सूक्ष्म तपासणी संच आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात राबवण्यात आला.
याहा मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे मुख कर्करोग व स्तन कर्करोग तपासणी किट चे वितरण आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या मार्फत वितरित करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात नंदुरबार तालुक्यात प्रा. आ. केंद्र आष्टे, कोपर्ली, नटावद, शहादा तालुक्यात सारंगखेडा, वडाळी, कुसुमवाडा, शहाणा, तळोदा तालुक्यात, प्रतापपुर, बोरद, अक्कलकुवा तालुक्यात ब्रिटिश अंकुशविहीर, काठो, खापर, नवापुर तालुक्यात पळसून, चिंचपाडा, गताडी तसेच धडगाव तालुक्यात धनाजे, चूलवड, तलई यांना किटचे वितरण करण्यात आले.
वितरित करण्यात आलेल्या किट चा जनतेस कसा उपयोग होतो त्याचा फायदा कसा याबाबत पडताळणी करण्यात येईल. व त्यानुसार उर्वरित आरोग्य संस्थांना सदर किट चे वितरण करण्य प्रा. आ. केंद्र यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात यावी असे पालकमंत्री यांनी संगितले.
अध्यक्षा यांनी संगितले की, किट प्राप्त झालेल्या सर्व प्रा. आ. केंद्रांनी आपल्या स्तरावर व उपकेंद्र स्तरावर नियमित कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करावे जास्तीत जास्त नागरिकांची शिबिरात तपासणी करण्यात यावी मुख कर्करोग व स्तन कर्करोग बाबत स्वतंत्र तपासणी अहवाल आपल्या स्तरावर ठेवण्यात यावे असे सूचित केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी केल.
कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार पाटील, सर्व तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित. प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, ए.एन.एम., उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार पाटील यांनी मानले.








