नंदूरबार l प्रतिनिधी
समान नागरी कायदा आला तरीही आदिवासींचे आरक्षण अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ. हीना गावित यांनी केले.नंदूरबार येथे मणिपूर राज्यातील घटनेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की केंद्र सरकार नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करणार आहे.मात्र समान नागरी कायद्याबद्दल विविध अफवा परविण्यात येत असून समान नागरी कायदा आला तर आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येईल असा दावा करण्यात येतो. मात्र समान नागरी कायदा आणि आरक्षण काढण्याबाबत कुठलाही संबंध नाही.
समान नागरी कायदा लागू झाला तरीही आदिवासींचे आरक्षण अबाधित राहणार आहे.याबाबत समितीचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी याबाबत सांगितले आहे की, समान नागरिक कायदा लागू करताना आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही.मात्र जाणीवपूर्वक काही लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आरक्षण निघून जाणार असल्याच्या अफवा पसरवत आहे.त्या जाणीवपूर्वक आदिवासी संघटनांचे दिशाभूल करत असून चुकीची माहिती पसरवत आहेत.कुठल्याही परिस्थितीत समान नागरी कायदा लागू झाल्यास आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही असे प्रतिपादन खा. डॉ. हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्ह्यातील सातपुड्यातील नेते सात सात वेळेस निवडून ही त्यांच्या गावापर्यंत वीज अथवा रस्ते तयार करू शकले नाहीत.मात्र या नऊ वर्षाचा कार्यकाळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून त्या नेत्यांच्या गावापर्यंत वीजही पोहोचली आहे विकास कामे करताना मानसिकता असायला हवी असेही त्यांनी आमदार ॲड.के.सी.पाडवी यांचे नाव न घेता टोला लगावला.








