नंदूरबार l प्रतिनिधी
मणिपूर राज्यात आदिवासी महिलेसोबत घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करीत असून संसदेच्या अधिवेशनात महिलांवर होणाऱ्या अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असून मणिपूर राज्यातील घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे प्रतिपादन संसद रत्न खा. डॉ. हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या पुढे खा. डॉ. हीना गावित म्हणाल्या की, देशात मागच्या दुर्दैवी घटनेनंतर मणिपूर राज्यात घडलेली घटना ही शरमेने मान खाली घालणारी आहे.तिचा तीव्र शब्दात मी निषेध करते .दुर्दैवी घटनाही आदिवासी महिलेसोबत घडलेली आहे त्यामुळे महिला म्हणून मी त्याच्या तीव्र निषेध करते. याबाबत हिन प्रवृत्तीचे लोक या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी मणिपूर राज्यात घडलेली घटना बाबत संसदेच्या अधिवेशनात यावर प्रश्न उपस्थित करणार आहे.
त्यासोबत देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार असून यापुढे महिलांवर अत्याचार करण्याची हिम्मत व्हायला नको अशी मागणी करणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशी मणिपूर राज्यात घडलेल्या घटनेच्या शब्द तीव्र शब्दात निषेध पहिल्या दिवशी केला देशाचे पंतप्रधान याबाबत कडक पावले उचलत आहेत व ते दोशींवर कडक कारवाई करतील असा विश्वास आहे.
मात्र असे असताना मणिपूर येथील घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न अनेकांकडून सुरू आहे.मात्र अशा घटनेला कोणीही समर्थन करू शकत नाही. राजकीय पोळी साध्य करण्यासाठी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांना हात जोडून विनंती आहे की, मणिपूर येथील घटनेच्या माणुसकीच्या नात्याने बघा बीजेपीला टार्गेट करण्यासाठी याकडे बघू नका.मणिपूर घटनेचा तीव्र निषेध करत असून हा पक्षाचा नाही तर महिला सन्मानाचा विषय आहे. यासाठी सर्व पक्षांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन व्यक्ती म्हणून याच्या विरोधात एक वटायला पाहिजे.
देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. हा विषय संसदेत मांडण्यासाठी अधिवेशन सुरू असायला हवे मात्र विरोधीपक्ष अधिवेशन सुरू राहू देत नाहीत त्यांना विनंती आहे की, देशातील अनेक प्रश्न संसदेच्या अधिवेशनात पटलावर येण्यासाठी संसद सुरू राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खा. डॉ. हीना गावित यांनी सांगितले








