नंदूरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए.मिनस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए.मिशन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध गंमती-जमती व सर्पांबद्दल पोस्टर द्वारे माहीती सादर केली.
प्रत्येक शनिवारी परिपाठ दरम्यान विद्यार्थ्यांसमोर विविध थीम सादर करीत असतात ह्यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची थीम सादर केली. सर्वप्रथम मयूर राठोड व रोहन पाडवी यांनी विद्यार्थ्यांमध्ये सापांबाबतची माहिती दिली, सापांबद्दल कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान असावे याकरीता विषारी, बिनविषारी व निमविषारी सापांची ओळख करून दिली व सर्प चावल्यास कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा व भूलथापांना बळी न पडता रुग्णाला उपचाराकरिता दवाखान्यात नेण्यात यावे अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी डॉली खेतपाल या विद्यार्थ्यांनीने विज्ञानाचे महत्त्व विशद करीत रिद्धेश नांद्रे या विद्यार्थ्यांनी मानवी सांगाड्याचे संपूर्ण माहितीचे विश्लेषण केले. यानंतर प्रयोगशाळेतील विविध उपकरण व साहित्यांची ओळख तनिष्का बोधगावकर, आर्यांश ढोडरे, सार्थक कलाल, नताशा पावरा, पूजा हेगडे, पूजा साबळे, जानवी मिश्रा, विराज पवार, महम्मद खान, हिमालय वळवी, अश्विनी, लक्ष्मी वसावे, वर्षा वळवी या विद्यार्थिनींनी करून दिली.
यावेळी प्रितिका वळवी या विद्यार्थिनीने उदासीकरणाची अभिक्रिया सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवली यावेळी स्वाती पावरा या विद्यार्थिनीने मराठीतून तर दिव्या वसईकर या विद्यार्थिनीने इंग्रजी मधून मागील महिन्यातील विविध घटनांचा बातम्या विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. त्यानंतर मागील महिन्यात झालेल्या गांधी विचार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेत तनिषा होमा पाडवी, ह्या विद्यार्थिनीने सुवर्णपदक तर मानसी या खुशी ठाकूर आठवी ह्या विद्यार्थिनीने रजत पदक प्राप्त केले.या निमित्तानेच ह्या आठवड्यात झालेल्या लोकसंख्या ह्या विषयावर विद्यार्थ्यांकरीता विविध पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, अरुण गर्गे, अविनाश सोनेरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये चांगले कामगिरी करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे व शाळेचे नाव लौकिक करावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे प्रोत्साहित केले.यावेळी कार्यक्रमासाठी अविनाश सोनेरी, प्रतिभा गोसावी, पुष्पा निकम, आरती पाटील, रोहन पाडवी आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले.








