नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील कुकरमुंडा फाट्यावजळ उभी असलेल्या एस.टी. बसला दुचाकीने मागून धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर दोघे जण दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एच ५५६२) जात होते. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून नेत असतांना कुकरमुंडा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सुरत-शहादा बसला (क्र.एस.टी. जी.जे. १८ झेड ३०६५) दुचाकीने मागून धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली.
तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत प्रविणभाई छितूभाई चौधरी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायादा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जयसिंग वसावे करीत आहेत.








