नंदूरबार l प्रतिनिधी
गायरान जमिनी संदर्भात न्याय मिळावा यासाठी 20 जुलै 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .या मोर्चा साठी शेकडो नागरिक आज रेल्वेने मुंबई साठी रवाना झाले .
गायरान व जमीन अतिक्रण विरोधी सरकार चा निषेध करण्यासाठी हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. या मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील हजारो गायरान धारक सहभागी झाले आहेत. यासाठी आज रात्री रेल्वेने शेकडो नागरिक मुंबई साठी रवाना झाले .जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही सरकार ला जाब विचारणार असे मोर्चात सहभागी नागरिकांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोळी, तालुका अध्यक्ष गजेंद्र निकम,बारकू पाटील,संजय पाटील, आप्पा बैसाणे विशाल सामुद्रे ,प्रकाश जाधव, अशोक मोरे, नरेश शिंदे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी मोरे, रेखाबाई बैसाने ,राजदीप सामुद्रे, दिलीप महिरे, बेबीबाई महिरे, असलम बागवान ,कैलास महिरे यांचा सह नागरिक उपस्थित होते.








