म्हसावद l प्रतिनिधी
टोकरे कोळी युवा मंचच्या वतीन शहादा येथे गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, खेळाडू, पत्रकार, शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेले कर्मचारी आदींचा सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपक सोनवणे (साहित्यिक,जिव्हाळा फाउंडेशन) तसेच प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी, डॉ. योगेश सावळे.सारंगखेडा पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, एपीआय, मुंबई महेश श्रीराव, पोलीस उपनिरीक्षक उमेश रजेसिंग कोळी, प्रा.रजेसिंग कोळी,रामेश्वर साळुंखे (शिक्षक, अभिनेता, कवी).नारायण देवचंद शिरसाठ (ज्येष्ठ), गोपीचंद बोरसे (ज्येष्ठ पत्रकार), रामचंद्र काशिनाथ सपकाळे, हिलाल छन्नु सैंदाणे, अनिल नन्नवरे (सचिव, अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्ली),प्रवीणकुमार बाविस्कर (जळगाव जिल्हा अध्यक्ष), रामचंद्र सोनवणे (सेवा निवृत्त कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष), जगदीश बागुल (मित्तल ग्रुप, आफ्रिका), मनोहर वाघ (जेष्ठ मार्गदर्शक), अरुण भानुदास कोळी (वैद्यकीय अधिकारी), हिरा वाकडे, प्रवीण सावळे, प्रशांत शिंदेश्री.महेंद्र कोळी, वैशाली निकुम, सौ. चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दहावी, बारावी, कला, वाणिज्य आणि विज्ञान (प्रथम/व्दितीय/तृतीय वर्ष) शाखेतील व इतर अभ्यासक्रमात उत्तम गुणांनी उत्तीर्ण १४० विद्यार्थी तसेच २० सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, पत्रकार, शासकीय कर्मचारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या १० विद्यार्थ्यांना डॉ.राजेश कोळी (कान, नाक, घसा तज्ञ, भगवती हॉस्पिटल) यांच्यातर्फे रु.१ हजार १०० रोख देवून विशेष सत्कार करण्यात आला. कु.निकिता राजेंद्र शिंदे (एम.एससी. सुवर्ण पदक, बचौउम विद्यापीठ, जळगाव) हिला अनिल देविदास नन्नवरे यांनी रु.1 हजार 100 रोख देवून विशेष सत्कार केला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करत आपले ध्येय गाठले पाहिजे. त्यासाठी जिद्द, चिकाटीने स्पर्धा परीक्षा, उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे. सोशल मीडियाचा अति वापर टाळावा, गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नये अशा विविध विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच डॉ.राजेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे भविष्यात देशाला घडविणारे चांगले नागरिक व अधिकारी तयार होतील. यावेळी संजय सोनवणे (साई सेवा लॅब, शहादा) यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे रक्तगट तपासून त्यांना रक्तगटाची ओळख करून देवून रक्तगट कार्ड देण्यात आले. जगदीश बागुल (मित्तल ग्रुप, आफ्रिका) यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष रोपे भेट दिली. तसेच राहुल कोळी यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, पालक व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच कार्यक्रमाला विशेष आर्थिक सहाय्य करणाऱ्या समाज बांधवांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कोळी व गायत्री सावळे यांनी केले. तसेच आभार सागर कोळी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी कोळी जमात युवा मंच धुळे, सूरत फ्रेंड्स ग्रुप सूरत, आदिवासी विकास संघ, आदिवासी कोळी समाज समन्वय समिति, वाल्मिकलव्य सेना, कोळी महासंघ, अखिल भारतीय कोळी समाज धुळे-नंदूरबार, जिव्हाळा फाउंडेशन कोळी समाज, कोळी समाज सेवाभावी संस्था नंदूरबार , संघर्ष समिति जळगाव, टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यंदा कर्तव्य आहे विवाह संस्था, आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय संस्था, कोळी जमात कर्मचारी संघटना धुळे-नंदूरबार, वाल्मीकि साम्राज्य ग्रुप, वाल्या सेना ग्रुप खानदेश, महाराष्ट्र कोळी समाज संघ, वीरांगना झलकारी बाई स्री शक्ति सामाजिक संस्था धुळे,
सामाजिक हक्क संरक्षण व प्रबोधन समिति शहादा या सर्व कोळी ढोर/टोकरे कोळी अनुसूचित जमातीच्या संघटनांचे सहकार्य लाभले. प्रविण सावळे, सुरेश जाधव , टोकरे कोळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष नितीन कोळी, भैय्यासाहेब कोळी (खान्देश विभाग प्रमुख), मनोज शिरसाठ (धुळे जिल्हाध्यक्ष), चेतन शिंदे, निलेश शिरसाठ, निलेश शिंदे, लक्ष्मण भाऊ, विकास कोळी, सचिन कोळी, सागर कोळी (अमळनेर), शिवाजी कोळी, घारू कोळी, हेमंत सूर्यवंशी, अर्जुन शिरसाठ, जिग्नेश कोळी, पंकज कोळी, किरण निकम, हिम्मत कोळी, आनंद कोळी, संजय दावळे,दिलीप शिरसाठ, दिलीप साळुंखे, गणेश कोळी, निलेश शिंदे, राहुल कोळी, हेमंत कोळी, विशाल चित्ते, सुनिल कोळी, योगेश, आकाश महाले, दिनेश कोळी आदि समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.








