नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व नंदुरबार डिस्ट्रीक सॉकर असोसिएशन, यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 18 ते 20 जुलै 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले.
सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दि. 18 जुलै 2023 रोजी शिवछत्रपती पुरस्कारार्थी बळवंत निकुंभ, पोदार इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक मुकुंद इंगळे, नंदुरबार डिस्टीक सॉकर असोसिएशनचे सचिव योगेश परदेशी, क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी व क्रीडा शिक्षक दिनेश बैसाणे, आशिष वळवी, रोहित महाले, आशिष कडोसे, कैलास भांडारकर, धोंडीराम शिनगर, दुर्गेश लांडगे, हर्षल चौधरी, विशाल मच्छाले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सदर उद्घाटन प्रसंगी बळवंत निकुंभ यांनी मार्गदर्शन केले. सदर स्पर्धेचे पंच म्हणून योगेश कुभांर, किरण मिस्तरी, अजय गवळी, मिलींद गायकवाड, दर्शन नेरकर, जय चौधरी, भावेश चौधरी, रोनक अग्रवाल यांनी काम पाहिले तर सुत्रसंचालन अमोल पगारे यांनी केले व आभार मुकेश बारी यांनी मानले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 24 संघांनी सहभाग घेतला आहे.








