नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोटनिवडणुक प्रक्रिया घेण्यात येत आहे. यात नंदुरबार तालुक्यातील ५ गटांसाठी २७ तर ५ गणांसाठी २३ जणांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान आज अर्ज माघारीच्या दिवशी ४ गटातील १५ तर ५ गणातील १० उमेदवारांनी आज अर्ज माघार घेतल्याने आता ४ गटांसाठी १२ तर गणांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान कोपर्ली येथील एका उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतल्याने त्यागटासाठी माघारीची तारीख २९ सप्टेंबरदेण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांचा मागास प्रवर्गातर्ंगत ११ जि.प. व १४ पं.स. गणातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. सदर सदस्यांच्या निवडीसाठी सुरूवातीला पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर कोरोनाचा पार्श्वभुमीवर छाननीअंती निवडणुक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर दि.१३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक घेण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार आज दि.२७ सप्टेंबर रोजी अर्ज माघारीच्या शेवटचा दिवस होता. आज नंदुरबार तालुक्यातील ४ गट व ५ गणातील इच्छुक उमेदवारांनी माघारी घेतली. यात कोळदा गटातून रिना रविंद्रसिंग गिरासे, जिजीबाई रविंद्र पाडवी, कविता महेंद्र पाटील, खोंडामळी गटातून शोभा शांताराम पाटील, दिनेश विक्रम पाटील, दिपक दशरथ पाटील, रनाळा गटातून कल्पना शांतीलाल पाटील, प्राजक्ता मनोज राजपूत, दिव्यानी दिपक पाटील, रूपाली प्रमोद पाटील, सुशिलाबाई पंडीत पाटील, मांडळ गटातून स्मिता मधुकर पाटील, शोभा लोटन पाटील, भाग्यश्री जगदिश पाटील, चंद्रकला सुधाकर धामणे यांनी आज अर्ज माघार घेतले. तर नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली गणातून बाबडीबाई कांतीलाल ठाकरे, पुष्पांजली मुकेश गावीत, पातोंडा गणातून प्रमिला प्रभाकर पाटील, वंदना संजय पटेल, होळतर्फे हवेली गणातून सरूबाई गिरधर मराठे, नंदाबाई पावबा मराठे, नांदरखे गणातन जगन चंदू कोकणी, गुजरजांभाली गणातून भावेशकुमार काळुसिंग पवार, युवराज किसन माळी, सुरेश जयसिंग नाईक यांनी आज नामांकन मागे घेतले. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील ४ गटांसाठी १२ तर ५ गणांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान कोळदे गटात भाजपाच्या सुप्रिया विजयकुमार गावीत, शिवसेनेच्या आशा समीर पवार, राष्ट्रवादीच्या सोमीबाई फत्तू वळवी, खोंडामळी गटातून शिवसेनेचे गजानन भिका पाटील, भाजपाचे शांताराम साहेबराव पाटील, राष्ट्रवादीचे सुनंदाबाई धनराज पाटील, अपक्ष पंकज संभाजी सोनवणे,रनाळा गटातून भाजपातर्फे रिना पांडुरंग पाटील, शिवसेनेतर्फे शकुंतला सुरेश शिंत्रे, मांडळ गटातून भाजपातर्फे रेखा सागर धामणे, कॉंग्रेसतर्फे विमल लाला भिल, शिवसेनेतर्फे जागृती सचिन मोरे, गुजरभवाली गणातून शिवसेनेतर्फे शितल धर्मेंद्रसिंग परदेशी, कॉंग्रेसतर्फे पल्लवी विश्वनाथ वळवी, भाजपातर्फे मधुमती मोहन वळवी, पातोंडा गणातून राष्ट्रवादीतर्फे यमुनाबाई गुलाब नाईक, भाजपातर्फे लताबेन केशव पाटील, शिवसेनेतर्फे दिपमाला अविनाश भिल, होळतर्फे हवेली गणातून भाजपातर्फे सिमा जगन्नाथ मराठे, शिवसेनेतर्फे स्वाती दिपक मराठे, नांदर्खे गणातून शिवसेनेतर्फे प्रल्हाद चेनसिंग राठोड, भाजपातर्फे सुनिल धर्म वळवी तर गुजरजांभाली गणातून कॉंग्रेसतर्फे रंजना राजेश नाईक, भाजपातर्फे सुनिता गोरख नाईक, शिवसेनेतर्फे तेजमल रमेश पवार हे उमेदवार रिंगणात आहेत. आज माघारीनंतर प्रचारामध्ये रंगत येण्याची चिन्हे आहे.
नंदुरबार तालुक्यातील ५ गटासाठी व ५ गणासाठी पोटनिवडणुकीत आज नामांकन माघारीच्या शेवटचा दिवस होता. यात कोपर्ली गटातील शिवसेनेचे उमेदवार ऍड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या अर्जावर कोपर्ली गटातील अपक्ष उमेदवार ऍड.राहुल श्रीराम कुवर यांनी हरकत घेतल्याने सदर प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे कोपर्ली गटासाठी आज माघार घेण्यात आली नाही. न्यायालयाचा निकालानंतरच दि.२९ सप्टेंबर रोजी कोपर्ली गटासाठी माघारीची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
शहादा तालुक्यात चार गटातून ३० तर आठ गणातून १५ जणांनी माघार
शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत ८६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते आज दि. २७ रोजी माघारी अंती गटातून तीस तर गणातून १५ जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले त्यात गटात तेरा तर गणात २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात लोणखेडा गटात पुन्हा एकदा सरळ लढत होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे इतर मागास वर्गीय प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने निवडणूक आयोगाने त्याजागी पोटनिवडणूक जाहीर केली काळात राज्यशासनाने विनंती केल्यानुसार काळ निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा आहेत,त्या ठिकाणाहून पुन्हा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार शहादा तालुक्यातील चार गटात व आठ गणात छाननी पर्यंतचा कार्यक्रम झाला होता. आज (ता.२७) माघारी अंती गटातून ३० तर गणातून १५ व्यक्तींनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने गटात १३ तर गणात २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.