नंदुरबार l प्रतिनिधी
साखर आयुक्तांनी घोषित केलेल्या साखरकारखान्यांच्या यादीत एक रकमी पेमेंट देणारा जिल्ह्यातील आयान साखर कारखाना ग्रीन झोन मध्ये आहे तर उर्वरित दोघी सहकारी साखर कारखाने रेडझोन मध्ये आहे. शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासंदर्भात ही यादी आज घोषित करण्यात आली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज ही यादी प्रसिद्ध केली.
ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस नोंद केली आहे. गाळप हंगाम 2020 21 मध्ये रास्ता आणि किफायतशीर ऊसदराची रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी विहित कालावधीत अदा केली आहे तर काही कारखान्यांनी कालावधी उलटूनही रक्कम दिलेली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून साखर आयुक्तांकडे तक्रारी होत आहेत. राज्यातील काही साखर कारखाने वेळेवर आणि अचूक पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा करत आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना समजावे या हेतूने योग्य ती माहिती पुरवण्याच्या सूचना मंत्री समितीने साखर आयुक्तांना केल्या.
कोणत्या कारखान्याला ऊस पुरवठा करावा याबाबतचा निर्णय घेणे सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी एफआरपी अदा करणारे विलंबाने आधार कारणारे आणि मुदत संपूनही अदा न करणारे असे विगतवारी करून कारखान्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील ऑस्ट्रेलिया अर्थात आयाम मल्टीस्टेट कारखाना शंभर टक्के रक्कम अदा करणारा ठरला असून तो ग्रीन झोन मध्ये आहे तर पुरुषोत्तम नगर येथील श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत पूर्ण रक्कम अदा केली नाही तोच प्रकार डॉ कारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्या बाबतीतही आहे. आयुक्तांनी दिलेल्या यादीनुसार सातपुडा कारखान्याने 83% तर डोकं येथील कारखान्याने 79 टक्के रक्कम अदा केली आहे.