नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे माजी खा.किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता यामुळे किरीट सोमय्या यांच्या सर्वत्र निषेध करण्यात आला असून नंदुरबार शहरातील दीनदयाळ चौकात उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने भाजपाचे माजी खा किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
भाजपाचे माजी खा किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओचा सर्वत्र निषेध नोंदविला जात असून या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, यांच्या आदेशान्वये युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई, विभागीय सचिव विराज कावडीया ,नंदुरबार जिल्हा विस्तारक कुणाल कानकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाअधिकारी अर्जुन मराठे यांच्या नेतृत्वात आज नंदुरबार शहरातील दिनदयाळ चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने माजी खा किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात येऊन त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनाला नंदुरबार जिल्हा युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे ,युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी मालती वळवी ,उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, महानगरप्रमुख पंडित माळी युवासेना शहर प्रमुख दादा कोळी, तालुकाप्रमुख विजू ठाकरे आनंदा पाटील, घारु कोळी, अजाज शेरा, राहुल चौधरी, रुपा भरवाड, छोटू चौधरी, गोविंदा चौधरी गोलू चौधरी, धीरज घाटे तसेच युवा सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.








