नंदुरबार l प्रतिनिधी
माळीवाडा परिसरात उत्तम आरोग्यासाठी सुसज्ज अत्याधुनिक साहित्यांनीयुक्त व्यायाम शाळेची उभारणी करणार असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख हा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार शहरातील माळीवाड्यातील संत सावता महाराज मंदिराच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण शिवसेनेचे संपर्कप्रमुख हा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत. माळीवाळ्यातील नागरिकांनी आम्हाला मोलाची साथ दिली आहे. परिसरात युवकांसाठी अत्याधुनिक साहित्यांनीयुक्त व्यायाम शाळेची उभारणी करणार.
यावेळी संत सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रसंगी प्रवेशद्वारासाठी योगदान देणारे समाजातील ज्येष्ठ नागरिक मिठाराम माळी यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक जगन्नाथ माळी यांनी केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शिवसेना (शिंदे गट)शहरप्रमुख विजय माळी,निंबा माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश माळी,कैलास माळी,मनोज माळी,राकेश खलाणे, धर्मा माळी,देवाजी माळी,चुडामन माळी विजय बोढरे,काशीनाथ बोढरे,कमलाकर बोढरे,पांढुरंग माळी,सदाशिव माळी,वसंत माळी,सुनिल माळी,धनराज माळी अविनाश माळी,कुणाल माळी आदी उपस्थित होते.








