नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नूतन पदाधिकारी सत्कार सभारंभ तसेच पदनियुक्ती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आमदार उदेसिं पाडवी हे होते. प्रमूख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. दानिश पठाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप,ज्येष्ठ नेते डॉ.रामराव आघाडे,सौ मंजुळा पाडवी,सौ.दीपांजली गावित , केशरसिंग क्षत्रिय,तळोदा कृ उ.बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय ,
तळोदा खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन पुरुषोत्तम चव्हाण,माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक इकबाल शेख, परदेशी,बाळासाहेब मोरे,उमाकांत पाटील,सुनिल राजपुत,सय्यद गुड्डू पैलवान,आदी मान्यवर,आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे
तळोदा शहर अध्यक्ष-योगेश मराठे.तळोदा तालुका अध्यक्ष-संदिप परदेशी, शहादा शहर अध्यक्ष-निलेश पाटील, धडगाव तालुका अध्यक्ष-राहुल पावरा यांची निवड करण्यात आली.

युवक जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पृथ्वीराजसिंह रावल, जिल्हा सचिव जगदिश चौधरी, जिल्हा चिटणीस हितेश ढिवरे.सुनिल गावित, युवक सोशल मीडिया प्रमुख-प्रतिक पाटील, जिल्हा सदस्य प्रणय पाटील यांची निवड करण्यात आली.
तर जिल्ह्यातील युवक शहर अध्यक्ष म्हणून नंदुरबार शहर अध्यक्ष मिलीन जाधव, शहादा शहर अध्यक्ष शोयब खिमाणी, नवापूर शहर अध्यक्ष योगेश पाटील, धडगाव शहर अध्यक्ष सचिन पावरा, तळोदा शहर अध्यक्ष गणेश राणे यांची निवड करण्यात आली.
युवक तालुका अध्यक्ष
नंदुरबार तालुका अध्यक्ष दिनेश सोनवणे, तळोदा तालुका अध्यक्ष दिपक वळवी, धडगाव तालुका अध्यक्ष गुलाब पाडवी. या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.








