नंदुरबार l प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षपदी भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता तुकाराम सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने माजी नगरसेविका संगीता सोनवणे यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची दखल घेऊन सदर निवड करण्यात आली आहे. या संदर्भात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे, प्रदेश सचिव ईश्वर गायकवाड, जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी नुकतेच संगीता सोनवणे यांना नियुक्तीपत्र दिले.
संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य, सामाजिक चळवळ उभी करून संघटना वृद्धिंगत करीत संघटनेचे नाव लौकिक करावे तसेच स्वातंत्र, समता, बंधुभाव ही राज्य घटनेचे तत्व प्रमाणभूत मानून सामाजिक एकय व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी आणि जात, धर्म, पंथ, पक्ष निरपेक्षपणे कार्य करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.संगीता सोनवणे यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे.








