नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ 8 लाखांचा मद्यसाठासह 15 लाखाचा मुद्देमाल तळोदा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आमलाड ते बहुरूपा दरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे काल दि. 14 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला.
त्यावेळी आयसर गाडी ( क्रं.एम.एच.18, बी.जी.8851 ) वाहनातून सुमारे 8 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.तसेच 15 लाख 70 हजार 232 रुपये किमतीची आयशर असा एकूण 23 लाख 70 हजार 232 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.याप्रकरणी पोना.विजय जावरे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात
अज्ञात आयशर चालक तसेच मालक यांच्याविरुद्ध
महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, सपोनि अविनाश केदार, सागर गाडीलोहार, पुना पाडवी, पोना अजय पवार, पोना विलास पाटील, विजय जावरे, पो.शि.संदीप महाले, महिला एएसआय संगीता बाविस्कर यांच्या पथकाने केली. चालक वाहन सोडून फरार झाला आहे.








