Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार, जळगाव जिल्ह्यासह, गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणारी टोळी जेरबंद, सात लाखाच्या मुद्देमालासह 13 गुन्हे उघड

team by team
July 13, 2023
in क्राईम
0
नंदूरबार, जळगाव जिल्ह्यासह, गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणारी टोळी जेरबंद, सात लाखाच्या मुद्देमालासह 13 गुन्हे उघड

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार, जळगाव जिल्ह्यासह,गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून 7 लाखांच्या मुद्देमालासह 13 गुन्हे उघड आणण्यात यश आले आहे.

 

 

मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते. नंदुरबार शहरातील उपनगर परिसरातील गिरीविहार गेट भागात एकापाठोपाठ 2 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यामुळे धुमस्टाईल सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपीतांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

 

 

दि. 11 जुलै 2023 रोजी दुपारी 13 वाजेच्या सुमारास महिला रजनी सुधीर पाटील रा.जनतापार्क लिंकरोड नवापुर यांच्या दुकानात दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यांत गुंतवुन ठेवून दोन अज्ञात इसमांपैकी एका इसमाने त्यांच्या गळयातील सोन्याची मंगलपोत ही जबरीने ओढुन नेल्याने त्यांनी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथके तयार करुन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलीस ठाण्याची पथके नवापुर ते विसरवाडी पोलीस ठाणे व नवापुर ते सोनगढ (गुजरात राज्य) या रस्त्यावर गस्त तसेच नाकाबंदी करीत असतांना,आर. टी.ओ. नाका नवापुर येथे एक संशयीत वाहन सोनगढ ते महाराष्ट्र राज्याकडे भरधाव वेगाने येतांना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता नाकाबंदी चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनास काही अंतरावर थांबविले.

 

 

वाहनातील अब्बास ईबाबत शेख ( ईराणी) रा. रजा टॉवर जवळ, पापानगर भुसावळ, सादीक ईबाबत शेख ( ईराणी) रा. रजा टॉवर जवळ, पापानगर भुसावळ, सखी मोहम्मद खान ( ईराणी) रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ, एक अल्पवयीन मुलगा तसेच वाहन चालक अनिल शामराव सोनवणे रा. अंजाळा ता. यावल जि.जळगाव यांना ताब्यात घेतले.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे वर्णन नवापुर शहरातील जनतापार्क येथे झालेल्या सोनसाखळी चोरीतील अज्ञात इसमांशी मिळतेजुळते वाटल्याने त्यांना ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी नवापुर शहरात जनतापार्क येथे त्यांचा एक साथीदाराच्या मदतीने मोटर सायकल वाहनावर अब्बास शेख (इराणी) व एक अल्पवयीन मुलाने मिळून एका दुकानातील महिलेच्या गळ्यातून चैन ओढून पळून गेल्याचे सांगितले, तसेच त्यांना इतर ठिकाणी कोठे या प्रकारचे गुन्हे केले आहे काय ? या बाबत विचारपुस केली असता त्यांनी 11 जुलै 2023 रोजीच गुजरात राज्यातील व्यारा शहरात व पलसाणा शहरात अब्बास इबाबत शेख (इराणी) व त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चैन ओढून पळून गेल्याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

 

ताब्यात घेण्यात आलेले इसम व वाहनाची तपासणी केली असता 90 हजार रु. कि. ची एक 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत. 67 हजार 500 रु. कि.ची एक काळे मणी असलेली 15 ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत. 32 हजार 500 रु. किं.चे 5 विविध कंपनीचे मोबाईल, 5 लाख रु. कि.ची एक मारुती सुझुकी कंपनीची डिझायर पांढऱ्या रंगाची ( एम.एच.19, सी.यु. 6489)

 

तसेच ताब्यातील संशयीत आरोपीतांना यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे ? या बाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी नंदुरबार व जळगांव जिल्ह्यात येथे सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीचे गुन्हे केल्याची सविस्तर माहिती दिली. त्याबाबत माहिती घेतली असता

नवापुर, उपनगर, नंदूरबार शहर 2, जळगाव तालुका पोलीस ठाणे, चोपडा शहर, भुसावळ बाजारपेठ,चाळीसगाव शहर, पलसाना (गुजरात) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून हे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीताकडून 1 लाख 57 हजार 500 रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, 32 हजार 500 रुपयांचे पाच मोबाईल व 5 लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन असा एकुण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करून नाशिक परिक्षेत्रातील व गुजरात राज्यातील सोनसाखळी चोरी (चैन स्नॅचिंगचे ) एकुण 13 गुन्हे उघडकीस झाले आहेत. तसेच पाचही संशयित आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

ताब्यात घेण्यात आलेला सादीक ईबाबत शेख ( ईराणी) यांच्या विरुद् जळगांव, बीड, बुलढाणा, अहमदनगर व मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यात असे एकुण 32 गुन्हे, अब्बास अली ईबाबत अली यांच्याविरुध्द 1 गुन्हा, सखी मोहम्मद ईराणी याच्याविरुध्द् 2 गुन्हे, अल्पवयीन मुलाविरुध्द मालमत्तेविरुध्दचे 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

कौशल्यपूर्वक तपास करुन जबरी चोरीसारखा मालमत्तेविरुध्दचा आव्हानात्मक गंभीर गुन्हा अवघ्या चार तासात उघड करुन नवापूर येथील गुन्ह्यातील व गुजरात राज्याच्या पलसाना येथे झालेल्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाला पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.

 

 

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, हेंमत सैंदाणे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हिंदूद्वेष्टा टिपू सुलतान याचा जयघोष करणाऱ्या गुंडांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, विविध संघटनांनी मागणी

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर,असे असतील मंत्र्यांकडे खाते

Next Post
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर,असे असतील मंत्र्यांकडे खाते

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर,असे असतील मंत्र्यांकडे खाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add