Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची दोन विद्यापिठात औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड

team by team
July 11, 2023
in शैक्षणिक
0
प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची दोन विद्यापिठात औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड
शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली असून त्यांना या बाबतचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) कुलगुरू व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ प्रमोद येवले यांच्या शिफारशीनुसार डॉ.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.पवार यांचा अनुभव, संशोधन आणि कार्याची दखल घेऊन सदर विद्यापीठाने त्यांची विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉ.एस.पी.पवार हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे अधिसभा (सिनेट) सदस्य असून विद्यापीठात फार्माकोग्नसी व फायटोकेमिस्ट्री या विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.तसेच  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या औषधनिर्माणशास्त्रच्या संशोधन आणि मान्यता समितीच्या व या विभागाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन पद त्यांनी भूषविले आहे. त्यांचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त शोध निबंध तसेच संशोधन यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना पंचवीस वर्षापेक्षा जास्त औषधनिर्माणशास्त्रच्या (फार्मसी) च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव असून डॉ. पवार यांना अनेक महाविद्यालयात आमंत्रित शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी आमंत्रित केलेे जाते.
आता पर्यंत एकूण 9 पी.एच.डी. (पदव्युत्तरपदवी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून त्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. पूर्ण झाले असून 8 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच पदव्युत्तर (एम.फार्मसी) च्या अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी (रिसर्च प्रोजेक्ट) मार्गदर्शन केले आहे व 10 पेक्षा जास्त पुस्तकांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले आहे. त्यांचा ह्या संपूर्ण कार्यशैली व अनुभवामुळे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) कुलगुरू व फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ पी.जी.येवले, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील यांनी डॉ.पवार यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी वृंद यांनी प्राचार्य डॉ.पवार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Next Post

फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ

Next Post
फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ

फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add