नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी फाट्यावर सुमारे २५ हजार रुपये किंमतीची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील आमलबारी फाट्यावर शेख शाफियोद्दीन याने त्याच्या दुकानासाठी सुमारे ३५० युनिटची ११ हजार ६१८ रुपये किंमतीची वीज व हरुन धामिया चामार याने त्याच्या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ३६० युनिटची ११ हजार ८४४ रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले . याबाबत सहाय्यक अभियंता नरेश गणू कोरचा यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .