नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरावर लागलेला हिंदुद्वेषी टिपू सुलतान चा फलक प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या पुढाकाराने काढण्यात आला. याचे औचित्य साधून भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुनी नगरपालिका चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य स्वागत-सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी विजय चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हिंदू जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी विजय चौधरी. आमदार राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस बळीराम पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, अजय कासार, जयेश चौधरी, किन्नरी सोनार, काजल मछले, विनोद जैन आदि पदाधिकारी उपस्थित होते.









