नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांची जेष्ठ नात व एक्सलंसिया कंपनीचे डायरेक्टर विजय भास्कर बोरसे यांची जेष्ठ कन्या कू. मैत्रेयी विजय बोरसे हीची आय.सी.आय.सी.आय. प्रूडेंशीयल कंपनीत कंप्लायंस ॲाफीसर या प्रतिष्ठीत पदावर नियूक्ती झाली आहे .
मैत्रेयी हीने पूणे येथील इंडीयन लॅा कॅालेज येथे बी.ए.एल.एल. बी.चे शिक्षण पूर्ण केले व कॅंम्पस मूलाखतीतच तीला आय.सी.आय.सी आय.प्रूडेंशीयल कंपनीत निवड झाली. कॅालेजला असतांनाच तीने अनेक विषयात पूणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता.
१२ वी सायंसला ९० टक्के मार्कस असूनही सायंस किंवा इंजीनीअरींगला पेक्षा विधी शाखेत का प्रवेश घ्यायच ठरवल याबाबत मैत्रेयी म्हटली की, ग्लोबलायझेशनमूळे सद्ध्या विधी , कला व वाणीज्य क्षेत्रात अनेक मोठ्या पगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षणाबरोबर कामाचा अनूभव घेतल्याने तूम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यास उपयोग होतो.
मैत्रेयीने शिकत असतांनाच सूप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या वकीलांकडे व अनेक नामांकीत कंपन्यात इंटर्नशिप केली होती त्यामूळे तीला फायदा झाला. मैत्रेयीच्या या स्तूत्य निवडीमूळे तीचे अनेक ठिकाणी अभिनंदंन होत आहेत.