नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यातील सुंदरदे येथे विजेच्या शॉक लागून शेतात बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नंदुरबार तालुक्यातील सुंदरदे रस्त्यावरील दगा सुकलाल माळी यांच्या शेतात आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतीकामासाठी बैलगाडी नेली असता खताच्या गोण्या घेऊन जात असताना शेतात असलेल्या विद्युत खांब मुळे शॉक लागून बैलाच्या जागीच मृत्यू झाला .
त्यामुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले शेतीसाठी त्यांना अडचण निर्माण झाली यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा देखील केला आहे.नुकसान भरपाईची शेतकरी दगामाळी यांनी मागणी केली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .









