नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथे संसदरत्न खासदार हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनाशालेय साहित्य वाटप कार्यक्रमास जि.प.सदस्य शांताराम पाटील संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी खा. डॉ. हिना गावित वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य (वह्या पेन) वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,

बोराळाचे सरपंच नारायणसिंग राजपूत, विखरणचे सरपंच रवींद्र पाटील , खोंडामळी सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील , विनोद पाटील ,चंद्रशेखर पाटील , जगदीश पाटील, प्रल्हाद पाटील ,तुंबाभाई पटेल,उमाकांत पाटील, किशोरपटेल, माजी पर्यवेक्षक पी.पी.बागुल ,सिताराम दाजमल , प्राचार्य विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर वरील सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.








