नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून राहुलकुमार पवारयांची नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रवादी परिवार तळोदा तर्फे त्यांचा शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वेळी नूतन पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधतांना तळोद्यात होणाऱ्या घरफोड्या,ट्रॉफीक, रोडरोमियो यांच्या साठी माध्यमिक शाळा,बसस्टँड असल्या सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्यासाठी कर्मचारी नेमावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच पोलीस निरीक्षक यांनी आश्वाशीत करून सांगितले की,लवकरच तळोदा शहरवासींयाना पोलीस प्रशासकीय शिस्तबद्ध असे नियोजन अनुभवयास मिळेल.
ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,शहर उपाध्यक्ष अनिल पवार,गणेश पाडवी,नदीम बागवान,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आदिल शेख,संघटक राहुल पाडवी,सरचिटणीस महेंद्र पोटे,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,सहसंघटक नितीन वाघ,शाबीर मिस्त्री,नितीन मराठे,मुश्ताकअली कालुमिया,शिवम शेंडे,नासिर शेख, वैभव कर्णकार उपस्थित होते.








