Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 26, 2021
in शैक्षणिक
2
आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

नंदुरबार l प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागांतर्गत योजनेतील (प्लॅन) माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, सैनिकी शाळा, तुकड्यांना योजनेतर होवून (नॉन प्लॅन) नियमित वेतन मिळणार, अशी माहिती नाशिक विभाग पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात आदिवासी विभागांतर्गत शाळांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढील पंचवार्षिक योजनेत योजनेतर होवून त्यांना अनिवार्य/नॉन प्लॅनमध्ये वर्ग करुन नियमित वेतन मिळत असते. मात्र २००२-२००७ या पंचवार्षिक योजनेतील शाळांना २००७ नंतर नियमित वेतन मिळणे आवश्यक असताना २०२१ पर्यंत या शाळा योजना, कार्यक्रम, प्लॅनमध्येच असल्यामुळे राज्यातील नियमित वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुद्धा माहे जुलै २०२१ पासून राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यक्रम, योजनेतील शाळांचे वेतन थकीत आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागातील संघटनांमार्फत प्रतिनिधीक स्वरुपात शिष्टमंडळात जिल्हा मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष मुकेश पाटील, जिल्हा शिक्षण संघाचे सचिव डॉ.एन.डी.नांद्रे, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सचिव सय्यद इसरार यांनी नाशिक विभाग पदवीर आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्त्वाने मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे संबंधित शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, कक्ष अधिकारी रामदास धुमाळ, श्री.चव्हाण, श्री.पेटकर यांची भेट घेतली असता शालेय शिक्षण विभागाकडून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २८ कोटीचा निधी मंजुर केला. त्यामुळे या आर्थिक वर्षाचा वेतनाचा प्रश्‍न सुटला आहे.

तसेच या शाळांना नियमित वेतन मिळणेसाठी कार्यक्रमातून अनिवार्यमध्ये म्हणजे लेखाशिर्ष १९०१मधून लेखाशिर्ष ४४२ मध्ये रुपांतरण करण्यासाठीची कार्यवाही सुरु झालेली आहे. त्यासाठीचे चार टप्पे आहेत. त्यापैकी पहिला टप्पा शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे, आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत आदिवासी विकास मंत्री ना.ऍड.के.सी.पाडवी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव सामाजिक न्याय विभाग मंत्री ना.धनंजय मुंडे, वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर नियमित वेतन मिळणार आहे. यासाठी नाशिक विभागातील सर्व संघटना, पदाधिकारी, पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्त्वाने पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागांतर्गत प्लॅनमधील शाळांचे नॉन प्लॅनमध्ये रुपांतरण होईल, अशी आशा सर्व समस्याग्रस्त कर्मचार्‍यांना आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले, २२ जनावरांची सुटका, पाच संशयितांविरुध्द गुन्हा

Next Post

संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या भारत बंदची हाक

Next Post

संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या भारत बंदची हाक

Comments 2

  1. Nitin patil says:
    4 years ago

    Job

    Reply
  2. Nitin patil says:
    4 years ago

    Hi

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

May 20, 2025
प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी सहायकांचा एल्गार,एक दिवशीय धरणे आंदोलनातुन प्रशासनाचे वेधले लक्ष

प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी सहायकांचा एल्गार,एक दिवशीय धरणे आंदोलनातुन प्रशासनाचे वेधले लक्ष

May 20, 2025
रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

May 20, 2025
अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 20, 2025
शहादा,तळोदा पालिका निवडणुक युतीने लढवणार,अन्यथा ‘एकला चलो रे ‘ ; आ.चंद्रकांत रघुवंशीं

शहादा,तळोदा पालिका निवडणुक युतीने लढवणार,अन्यथा ‘एकला चलो रे ‘ ; आ.चंद्रकांत रघुवंशीं

May 20, 2025
सोलर प्लेट्सच्या आड होत होती अमली पदार्थांची तस्करी,एक क्विंटल किलो अफिम चुरा जप्त,चालकाला केली अटक

सोलर प्लेट्सच्या आड होत होती अमली पदार्थांची तस्करी,एक क्विंटल किलो अफिम चुरा जप्त,चालकाला केली अटक

May 19, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group