Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पी.जी पब्लिक स्कूलमध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा

team by team
June 29, 2023
in शैक्षणिक
0
पी.जी पब्लिक स्कूलमध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील चौपाळे शिवारातील श्री गोवर्धनसिंहजी शैक्षणिक सेवा समितीच्या पी.जी पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या गजरात दिंडी काढली. लेझीम,झांज, टाळ मृदुंगाच्या निनाद आणि मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषित विद्यार्थी भक्तीरसात दंग झाले होते.
पी.जी पब्लिक स्कूलमध्ये आज शाळेच्या आवारातून विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. वारकरीच्या पेहरावातील शाळेतील सर्वच विद्यार्थी जणू पंढरपूरच्या दिंडीत सहभागी असल्याच्या भास होत होता. दिंडीच्या अग्रभागी ढोल ताशांच्या गजर तर त्यामागे मुलींनी माथ्यावर तुळशी वृंदावन ठेवले होते.लेझीम,झांज, टाळ मृदुंगाच्या निनाद आणि मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषात विद्यार्थी भक्तीरसात चिंब झाले होते.
विठ्ठल रखुमाईच्या सजीव देखावा
विद्यार्थ्यांना सण उत्सवांची माहिती मिळावी यासाठी. पीजी पब्लिक स्कूलमध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन केले होते.दिंडीत विठ्ठल- रखुमाईचा सचिव देखावा सादर करण्यात आला होता. विठ्ठलाच्या देखावा आराध्य भावसार रखुमाईच्या देखावा सिद्धी सिद्धार्थ रघुवंशी यांनी सादर केला.
पर्यावरणाच्या दिला संदेश
विद्यार्थी वारकऱ्यांनी दिंडीमध्ये पर्यावरण बचावाच्या संदेश दिला. सहभागी अनेक विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण संवर्धन व बेटी बचावचे फलक झळकावाले.श्री गोवर्धनसिंहजी शैक्षणिक सेवा समितीचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी,मॅनेजिंग डायरेक्टर रुद्रप्रताप रघुवंशी,संचालक सिद्धार्थ रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्राचार्य आनंद परदेशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

खा.डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत कुलदीप वसावे,आरती पावरा पावरा यांनी पटकाविले विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add