Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाच्या धाडसी निर्णयाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष

team by team
June 27, 2023
in क्राईम
0
नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाच्या धाडसी निर्णयाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्यात काही भागात दोन गटात अनेक कारणांमुळे वादाच्या घटना होत असतानाच नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाने मात्र एक धाडसी निर्णय घेतला आहे.जगभरात येत्या 29 जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता एकादशीनंतर सण साजरा करण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लीम समुदायाच्या बहुतांश लोकांनी घेतला असून राज्यात सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना नागरिकांनी एकोप्याचे दर्शन घडवावे असे आवाहन केले होते त्यास जिल्ह्यातील मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी ऐक्याच्या दिशेने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे.एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून नंदुरबार पोलीसांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.

सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणा-या नंदुरबार पोलीस टीमचे प्रमुख पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेसह नंदुरबार पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, अक्कलकुव्याचे सदाशिव वाघमारे, शहाद्याचे दत्ता पवार,गृह पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,किरण खेडकर,भारत जाधव,शिवाजी बुधवंत,राहुल पवार,निलेश गायकवाड, ज्ञानेश्वर वारे, दीपक बुधवंत,निशामुद्दीन पठाण, API दिनेश भदाणे,राजन मोरे,धनराज निळे,प्रकाश वानखेडे यांच्या टीमने याकामी चांगली भूमिका बजावली.

बातमी शेअर करा
Previous Post

शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमात ८५ हजार नागरिकांना देणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add