म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय म्हसावद आणि म्हसावद पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीत सपोनि राजन मोरे, मुख्याध्यापक मनोज पाटील, उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल आणि पोलिस कर्मचारी,शालेय शिक्षक, शिक्षिका,सहभागी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल यांनी केले.तसेच म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सद्य परिस्थितीत किशोरवयीन मुले -मुली आणि युवकांना विविध अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन लागत असल्याचे सांगून,या व्यसनामुळे चोरी,कुटुंबात भांडणे,स्रीयांचे छळ होण्याचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली.
विद्यार्थी हाच उद्याच्या खरा समाज आणि राष्ट्र निर्माता असून तो अंमली पदार्थापासून दूर झाला तर नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी संकल्प करण्याचे आवाहन केले
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.पी.एम. पटेल यांनी अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी उपस्थित विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर,पो लीस कर्मचारी यांना शपथ देवविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल आणि पोलीस स्टेशनचे सपोनि राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.दादाभाई साबळे, पो.ह.बहाद्दुर भिलाला,पो.कॉ.उमेश पावरा,
राकेश पावरा,आणि पो.ह.कलिम रावताळे, उपशिक्षक,तनेश चौधरी,आर.सी.चव्हाण, अंकुश पावरा,विजय अहिरे,जी.एस.चौधरी, अनिता ठाकरे,दुर्गा पाटील,रेखा पाटील,माधुरी पटेल,शितल पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी विश्वनाथ पाटील,संदिप सुर्यवंशी,जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.








