नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सामाजिक न्यायदिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी, प्रमुख वक्ते राहुल पाटील तसेच मंचावर उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते राहुल पाटील म्हटले की छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक सलोखा, सामाजिक समरसता, सामाजिक समन्वय ,समानता जपण्यासाठी मोलाचे कार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष चौधरी म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षणाची दालने उघडलीत ते खऱ्या अर्थाने रयतेचे जाणता राजा होते. यावेळी प्रियांशु मच्छले, दर्शन बंजारा,मोहित मराठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आर्या वसईकर या विद्यार्थ्याने छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत खैरनार, प्रास्ताविक तुषार नांद्रे तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.








