नंदूरबार l प्रतिनिधी
अर्हत प्रतिष्ठान नंदुरबार वतीने खा.डॉ. हीना गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा महोत्सव सप्ताह नंदुरबार शहरात संपन्न होत आहे.
दरम्यान काल एस.ए. मिशन हायस्कूल येथील मैदानावर (अंडर १४ वर्षे मुले व १७ वर्षे मुली) फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी पत्रकार बाबासाहेब राजपूत, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील उद्योगपती मोहन खानवाणी, मीनल वाळवी, श्री.जयकर,डॉ.दिनेश बैसाने, जी. एन.पाटील, शांताराम पाटील, संतोष शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 17 संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे पंच म्हणून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विजय जगताप, खुशाल शर्मा, प्रवीण माळी, किरण मिस्तरी, योगेश कुंभार, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील,सौरभ साळुंके, शुभम कासार, अजय गवळी, उमेश बंजारा, संभाजी सोनवणे,सचिन पिंपळे,नंदू पाटील, संदीप खलाणे, हर्षवर्धन बैसाने,रामा हटकर,आशिष कडोसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पगारे यांनी केले आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले.








