नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे विरोधी गटाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्यामुळे शासनाकडून विशेष निधी मिळवून शहरातील विविध विकासकामे विरोधी गटाच्या माध्यमातून 60 लाखांच्या कामांचे भूमिपूजन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झाले.
दरम्यान हे काम ६० लाख रुपये निधीचे हे काम आहे. काम लवकर पूर्ण करू व चांगल्या प्रतीचे करू, असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी या वेळी सांगितले. नंदूरबार शहरातील पारशी चक्की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे पालिकेच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन झाले.
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हीना गावित, अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व विक्रांत मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे.
या वेळी नंदुरबार पालिकेचे नगरसेवक विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर, आनंद माळी, नगरसेवक गौरव चौधरी, प्रशांत चौधरी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, नगरसेविका संगीता सोनवणे, माजी नगरसेवक कमल ठाकूर, माणिक माळी, रशीद खाटीक, सलीम मिस्तरी, इरफान पेंटर, फारूक बागवान, आरिफ टेलर, बाला मिस्त्री, सुचित अहिरे, सुनील चौधरी, गणेश चौधरी, मनीष चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित होते.








