नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील साबलीपाणीचा आदलीपाडा येथे शेती हिस्से वाटणीच्या वादातून एकास काठीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील साबलीपाणीच्या आदलीपाडा येथील रतिलाल विकला पावरा व पिंटा विकला पावरा यांच्यात शेती हिस्सेवाटणीवरुन वाद झाला. या वादातून रतिलाल पावरा यांना पिंटा पावरा याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत रतिलाल पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात पिंटा पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मोहन शेवाळे करीत आहेत.








