नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील प्रमोद विनायक पाटील हे त्यांच्या दुचाकीने नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्याने जात होते. यावेळी काठोबा देवस्थान जवळील टेकडीच्या उतारावरुन जात असतांना एका अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाने दुचाकीला हुलकावणी दिल्याने प्रमोद पाटील हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रमोद पाटील यांना रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत योगेंद्र विनायक पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मनोज विसपुते करीत आहेत.








