नंदूरबार l प्रतिनिधी
शहरातील गिरीविहार कॉलनी येथे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत जबरीने चोरुन नेल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील गिरीविहार कॉलनी येथील रत्नाबाई प्रभाकर चौधरी या फिरण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी पायी जात असतांना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघा अज्ञात इसमांनी रत्नाबाई चौधरी यांच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार रुपये किंमतीची १० तोळे सोन्याची मंगलपोत जबरीने काढून घेत करण चौफुलीकडे पसार झाले.
याबाबत रत्नाबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात इसमांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.








