नंदूरबार l प्रतिनिधी
इंग्रजी शाळा प्रमाणे आता नंदुरबार नगरपालिकेच्या 5 शाळा डिजिटल झाल्या आहेत.
नंदुरबार शिक्षण मंडळ अंतर्गत नगरपालिकेच्या पाच शाळांना एचडीएफसी बँकेकडून सीएसआर फंडातून चाळीस लाखाचे डिजिटल क्लासरूम साठी मदत मिळाली या कामासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल तसेच लेखाधिकारी वर्ग एक श्रीमती. वैशाली जगताप आणि शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून नगरपालिकेच्या 16 शाळा पैकी शाळा क्रमांक 2, शाळा क्रमांक 7 ,शाळा क्रमांक 10 ,शाळा क्रमांक 12, व शाळा क्रमांक 20 तथा लोकमान्य टिळक विद्यालय नंदुरबार या शाळेतील प्रत्येकी एक वर्गखोली मध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक शाळेला आठ लाख रुपये याप्रमाणे चाळीस लाखाचे डिजिटल व्हर्च्युअल क्लासरूम, रंगरंगोटी, 65 इंची डिजिटल टीव्ही प्रोजेक्टर प्रत्येक शाळेला दहा दहा बेंचेस, कार्पेट देण्यात आले .डिजिटल वर्गामुळे या शैक्षणिक वर्षापासून पटसंकेत वाढ होत आहे. मुलांना आनंददायी शिक्षण दिले जाते त्यामुळे मुलांची उपस्थिती ही नगरपालिकेच्या शाळेत भरभराटीची दिसत आहे .शाळा क्रमांक 2 चे मुख्याध्यापिका नाझिमा परवीन शेख जाहीरोउद्दीन , शाळा क्रमांक 7 चे मुख्याध्यापक सचिन आव्हाड, शाळा क्रमांक 10 मुख्याध्यापक वासुदेव राजभोज,
शाळा क्रमांक 12 मुख्याध्यापक करणसिंग चव्हाण, आणि शाळा क्रमांक 20 च्या मुख्याध्यापिका उषा गावित , व लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रीतम परदेशी व सर्व शाळांच्या कर्मचाऱ्यानी अतिशय मेहनत घेऊन डिजिटल शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .गोरगरिबांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात सातत्याने टिकून राहावे यासाठी मुख्याधिकारी अमोल बागुल लेखाधिकारी वर्ग एक श्रीमती वैशाली जगताप आणि प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी नगरपालिकेच्या शाळेसाठी शर्तीचे प्रयत्न करून नगरपालिकेच्या शाळेंना चाळीस लाखाचे साहित्य उपलब्ध करून दिले.








