नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील इस्कॉन मंदिरातर्फे श्री.जगन्नाथ रथयात्रा शहरातील मोठा मारुती मंदिरापासून निघाली शहरातील प्रमुख मार्गावरून नेहरू पुतळा जवळील तालुका क्रीडा संकुल च्या मैदानावर समारोप करण्यात आला.
रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रथयात्रेत परिसरातील भाविकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले पुष्पवृष्टी केली. महिला पुरुषांसह इस्कॉनचे प्रमुख संत व महाराज यावेळी उपस्थित होते. रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. ठिकठिकाणी रथ यात्रेचे पूजन करण्यात आले. समारोपानंतर विदेशी भक्तांच्या समूह मार्फत प्रवचन देण्यात आले त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.








