नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी शहरातील साक्री नाका परिसर भागात वाहतूक नियंत्रीत करतांना आपले कर्तव्य बजावत असताना सदर ठिकाणी एका मध्य प्राशन केलेला इसम येऊन त्यानं वाहतूक पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी शहर पोलिसात सदर व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होते.
प्राप्त पोलीस माहितीनुसार दि. 24 जून 2023 शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसर भागात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी चंदन वतन बजरंगी हे वाहतूक नियंत्रित करीत आपले कर्तव्य बजावत असताना सदर ठिकाणी एक मद्यप्राशन केलेला इसम येऊन त्याने पोलीस कर्मचारी चंदन बजरंगी यांना धक्काबुक्की केली वाईट शिविगाळ करून या ठिकाणी उभा राहायचं नाही इथं काम करायचं नाही अशी दमदाटी करू लागला.
पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यास त्याने पोलिसांसोबत हूज्जत घातली याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सदर इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.








