म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा संघटक (गाईड) सौ. कविता वाघ यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांची नाशिक जिल्हा येथे बदली झाल्याने नंदुरबार जिल्याच्या स्काउट गाईड कार्यालयातर्फे व सर्व स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
जिल्हा संघटक (स्काऊट) सुधाकर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमती कविता वाघ यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने जिह्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत नेला याचा आलेख विदित केला. मंचावर उपस्थित मान्यवरानी श्रीमती वाघ मॅडम यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी गेल्या 7 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे मेहेनत घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात संख्यात्मक व गुणात्मक पद्धतीने वाढ करून स्काउट गाईड विभागाला समृद्ध केले. मनमिळाऊ व सहकार्यांची भावाना जपत त्यांनी सर्व स्काउटर गाईडर शिक्षक बंधुभागीनिना आपलेसे करून विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या अनुभवातून विदित केला.
प्रसंगी हिरालाल पाटील, प्रसाद दिक्षित, नरेंद्र पाटील, वाडेकर , संदिप पाटील श्रीमती नेरकर, फुलंब्रीकर , चेतना वाघ , श्रीमती भामरे यांनी भावना व्यक्त केल्या.
या निरोप समारंभप्रसंगी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जि प. सतीश चौधरी , जिल्हा अध्यक्ष यशवंत पाटील , जिल्हा आयुक्त (गाईड) तथा नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी , जिल्हा मुख्यालय आयुक्त पुष्पेन्द्र रघुवंशी, श्रीमती वर्षाताई जाधव, सहा. जिल्हा आयुक्त संजय जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त हेमंत पाटील व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रसंगी जिल्हा आयुक्त (स्का)तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिंद्र कदम, जिल्हा कार्यालयाचे सचिव तथा उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूसखान पठाण, सहसचिव श्रीमती नूतनवर्षा वळवी, सहा. जिल्हा आयुक्त तथा उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी मान्यवरांचे आभार व मनोगत जिल्हा लिपिक योसेफ गावित यांनी केले.








