भविष्यात निर्माण होणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर मार्ग काढून युवा पिढ़ीला पाणी बचतीची सवय लागावी,जलसंवर्धन व्हावे यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयमार्फत ‘कॅच द रेन’ अभियान राबविण्यात येत आहे.
म्हसावद l प्रतिनिधी
या अंतर्गत नेहरू युवा केंद्र नंदूरबार व युवकमित्र परिवार कोठली यांच्यातर्फे शहादा तालुक्यातील उधळोद,मंदाणे, कोठली,वडाळी,बामखेडा येथे पाणी बचतीवर जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना घरोघरी असलेल्या नळाना तोट्या बसवण्याचे आवाहन करण्यात आले तसेच भविष्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर मात करून पाणी बचत करणेसाठीच्या विविध उपाययोजनावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना पाणी बचतीवर आधारित सामुहीक शपथ देण्यात आली तसेच गावातील मुख्य चौकात पोस्टर्स प्रदर्शन करण्यात आले. नेहरू युवा केंद्र नंदूरबारचे जिल्हा युवा अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात युवकमित्र परिवार कोठली चे संस्थापक प्रवीण महाजन, बादलसिंग गिरासे,कल्पेश राजपूत,चंद्रमणी रायसिंग,सुशिल गव्हाणे, संग्राम गिरासे, प्रवीण राजपूत यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे यूवा स्वयंसेवक गणेश ईशी यांचे सहकार्य लाभले.








