मोलगी l
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे वाईस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांनी केली. तसेच शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी लहान चिमूकल्याना योग दिनाचे महत्त्व समजावून दिले तसेच वेगवेगळे योगासनाचे प्रात्यक्षिक मनोरंजकपणे दाखवण्यात आले. शाळेच्या मुलांनी या दिवसाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक लीला वसावे, मनीषा वसावे, हीराबाई वळवी यांनी मेहनत घेतली.
संस्थेच्या उपाध्यक्षा सुनंदा वळवी, सदस्य लालसिंग वळवी, संगीता वळवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतुक केले व पुढील वाटचाली साठी सुभेच्छा दिल्या.








