नंदुरबार l प्रतिनिधी
निवडणुकीच्या काळात गर्दी घेऊन फिरल्याने मतदारराजाला प्रसन्न करता येत नाही. आपण केलेली कामे हीच आपल्या विजयाचे भांडवल असते. भालेर गावात केलेली विकास कामे हीच माझी ओळख आहे.त्यामुळे मतदार सदैव माझ्या पाठीशी उभा राहिल. कारण मी आयुष्यात कोणाचेही मन दुखावले नाही, कोणाला कधी खोटे आश्वासन दिले नाही. मी जे बोलतो तेच करतो त्यामुळे प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा गजानन पाटील यांनी केला आहे.
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गटाची पोटनिवडणुक आहे. सिंदगव्हाण, समशेरपुर, कोरीट ,सावळदा, बोराळे,सुजालपुर,काकरदे, भालेर, तिसी, नगाव,खोंडामळी आदी गावात शिवसेनेचे उमेदवार गजानन भिका पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेत प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे.त्यांनी खोंडामळी गट पिंजुन काढला प्रचारात आघाडी घेतली आहे. खोंडामळी येथे प्रचाराचे नारळ फोडुन प्रचाराला सुरवात केली होती.यावेळी माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते.यांच्यासह विविध गावातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
मी तुमचा जागृत लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल. परिसराच्या विकासासाठी मला संधी द्या, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार गजानन भिका पाटील यांनी नागरीकांशी थेट संवाद साधतांना केले.