नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथे ॲग्रो एजन्सी रासायनिक खताच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी अर्ज केल्याच्या संशयावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , संजय रमण चौधरी यांचे नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथे श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी नावाचे रासायनिक खताचे दुकान होते . सदर दुकानाचा परवाना जिल्हा कृषी अधिकारी यांनी रद्द केल्याने सदर दुकान रद्द करण्यासाठी गोरख सखाराम पाटील यांनी अर्ज केला असा संशय घेवून कृष्णदास शिवदास पाटील , यश कृष्णदास पाटील , कांतीलाल मगन पाटील , श्रीराम मगन पाटील , संजय रमण चौधरी , राजेंद्र रमण चौधरी , भरत तुकाराम चौधरी व किशोर तुकाराम पाटील यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . तसेच गोरख पाटील यांच्या घरातील कुटूंबियांना देखील मारहाण करुन शिवीगाळकेली.याबाबत गोरख पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ४५२ , ३२३ , ३५४ , ५० ९ , ५०४ , ५०६ ( २ ) , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ.सुनिल अहिरे करीत आहेत .