नवापूर l प्रतिनिधी
नवापूर अग्रवाल समाजातर्फे मारवाडी प्रीमियर लीग क्रिक्रेट स्पर्धा डी.जे.अग्रवाल इग्लिश मिडीयम स्कुल येथे आयोजित करण्यात आली आहे .ही स्पर्धा दि १३ जुन ते १५ जुन पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या क्रिक्रेट स्पर्धाचे उद्घाटन अग्रेसन महाराज यांचे प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन व मैदानावर श्रीफळ अग्रवाल समाजाचे खजिनदार अजय अग्रवाल,सचिव ध्रुवेश अग्रवाल,सी.ए.वतन अग्रवाल,शैलेश अग्रवाल,रवि अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार आयोजकांनी केला.
यावेळी क्रिक्रेट स्पर्धत मारवाडी समाजाचे गुजराथ राज्यातील व्यारा,सोनगड,महाराष्ट्र राज्यातील चिंचपाडा,विसरवाडी,नवापूर,नंदु रबार,खांडबारा या शहरातील १० टिमने या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला आहे.या क्रिक्रेट स्पर्धा आयोजित करण्याचे कारण मारवाडी समाज बांधव एकञ येऊन युवक वर्गाला खेळाचे ज्ञान मिळावे व समाज एकजुट होऊन समाज कार्य करावे.आताचा युवक हा मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे आता युवक खेळ व स्पर्धा मध्ये मागे होत आहे.
हे सर्व चित्र पहाता आम्ही क्रिक्रेट स्पर्धाचे आयोजन केल्याची माहीती समाजाचे सचिव -ध्रुवेश अग्रवाल यांनी दिली.यावेळी अग्रवाल समाज बांधव मोठया संख्यने उपस्थित होते.यावेळी सोनगड व नवापूर क्रिक्रेट स्पर्धा रंगली होती.या कार्यक्रमाचे सुञसंचलन कल्पेश अग्रवाल यांनी केले.








