Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची, भाजपा महिला मोर्चाची मागणी

team by team
June 14, 2023
in राजकीय
0
आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची, भाजपा महिला मोर्चाची मागणी
म्हसावद l प्रतिनिधी
भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी व बदनामी करणाऱ्या आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चातर्फे देण्यात आले.
   या निवेदनात म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्या संदर्भात भाजप महिला मोर्चा नंदुरबार जिल्ह्याच्या प्रतिनीधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतोय जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या आमच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही.
आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही
म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत  यांना देण्यात आले.या प्रसंगी  महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा किन्नरीताई सोनार, महिला मोर्चा जिल्हा सचिव संगीता पाठक, शहादा शहर अध्यक्षा रोहिणी भावसार,  शहादा मीडिया प्रमुख नितेश्वरी पटेल,शहर उपाध्यक्षा दीपश्री साठे,रूपाली चौधरी, बायसी पावरा आदी महिला उपस्थित होत्या.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे मारवाडी प्रीमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ 

Next Post

शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

Next Post
शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add