नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील कामोद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घिसलीपाडा या गावात चक्रीवादळ वायामुळे अनेक घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्याची पाहणी आ.शिरीषकुमार नाईक यांनी केली.
यावेळी आदिवासी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आर. सी. गावीत, संदीप गावीत, विक्रम गावीत, जैंत्या गावीत, पास्टर काशिराम गावीत, दिलीप गावीत, जेरम्या गावीत, आदि उपस्थित होते.
संपूर्ण नवापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब आपत्कालीन निधी मधून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचे यावेळी नुकसान ग्रस्तांशी चर्चा करतांना सागितले. याबाबतीत नवापूर तहसिलदार यांच्याशी संपर्क करुन योग्य त्या सुचना करण्यात येतील असे ही सागितले.








