नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील एसटी आगार व्यवस्थापक म्हणून विजयकुमार नामदेव पाटील हे रुजु झाले असुन त्यांनी आज पदभार स्विकारला.
नवापूर आगार व्यवस्थापक विजयकुमार पाटील हे यापूर्वी जळगाव जिल्हातील एरंडोल येथे आगार व्यवस्थापक होते त्यानंतर जळगाव याठिकाणी आगार व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली आहे व आता नवापूर आगराचा आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. विजयकुमार पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावाचे मुळ रहिवाशी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर एस.टी आगार प्रमुख म्हणून आपली सेवा बजावतांना प्रवाशांच्या सुख सोयी कडे विशेष लक्ष देणार असून एस.टी.चा विविध उपक्रम व योजनेचा माध्यमातून आपण कार्य करणार आहोत.
प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊन सर्व एस. टी.कर्मचारी व चालक -वाहक यांचा साथीने चांगले कार्य आपल्या हातुन होईल.प्रवाशी वर्गाने एसटीचा प्रवास करुन एसटीच्या विविध योजनेच्या माध्यमातुन लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी पत्रकार विद्यानंद पाटील, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वाघ,पत्रकार संपादक अशोक साठे,प्रकाश खैरनार,दर्शन ढोले, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष प्रेमेंद्र पाटील,एस.बी अहिरे नाना आदि उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नूतन आगार व्यवस्थापक विजयकुमार पाटील यांच्या स्वागत सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.








