बोरद l प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तळोदाच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार गिरीश वखारे यांना नुकतेच एक निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकरांच्या नावाने विचाराने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एका युवकाचा खून केला जातो. नांदेड जिल्ह्यातील तरुण अक्षय भालेराव याचा जातीवादावरून खून केला जातो. त्याच बरोबर रेणापूर येथील गिरधारी तपघाले यांची सुद्धा हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राची ओळख सगळी वैचारिक विसरून माणसांमध्ये विष पेरण्याचे काम होत असल्याचे सध्यातरी चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वरील दोघं गुन्ह्यांमध्ये असणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी निवेदना मार्फत रिपब्लिकन पार्टी तळोदा आठवले गट यांच्यावतीने करण्यात आली आहे.
त्याचबरोबर मुंबई येथे घडलेली एक घटना उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून एक दोन दिवसांनी घरात घरी परतणारी तरुणी हे ती हॉस्टेल मध्ये एकटी आहे हे हेरून त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने तिच्यावर केलेला बलात्कार करून तिला ठार मारले. हा एकूण निंदनीय प्रकार राजधानी मुंबई येथे घडला ज्या ठिकाणी मुख्यमंत्री, गृहमंत्री वास्तव्यात आहेत अशा ठिकाणी अशा घटना घडतात तरी कशा असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
या घटनेत जबाबदार असणाऱ्या हॉस्टेलचे कर्मचारी,सुरक्षा रक्षक यांच्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
हे निवेदन देतेवेळी तळोदा येथील तहसील कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष भिकलाल ढोडरे ,संतोष ढोडरे,कन्हैयालाल ढोडरे, भुऱ्या सामुद्रे, शरद सोनवणे, सिद्धार्थ ढोडरे, रामदास भामरे, रवींद्र ढोडरे, संतोष ढोडरे, किशोर ढोडरे,शेख जमील शेख शरफू, महेंद्र ठाकरे,चंद्रकांत पाटील,नितीन गरुड ,सिद्धार्थ नरभवर, मंगलसिंग चव्हाण,इंदिराबाई चव्हाण, दयानंद चव्हाण आदी उपस्थित होते.








