नंदुरबार-
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार, माजी पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, नंदुरबार जिल्हा विस्तारक कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार जिल्हा युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे यांच्यातर्फे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार, माजी पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन तात्या मराठे, उपजिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर अधिकारी दादा कोळी, जिल्हा संघटक रोहन गावित, तालुकाप्रमुख विजय ठाकरे, घारू कोळी, धीरज घाटे, आनंद पाटील, मयूर चौधरी, गोविंदा चौधरी, छोटू चौधरी, पप्पू कोळी, अविनाश जाधव शिवसैनिक व युवसैनिक उपस्थित होते.








